संवादाता अभिजीत गाईन
गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित कलावंतांना आणि विद्यार्थ्यांना
डॉ.अनिरुद्ध वनकर देणार अभिनयाचे धडे
आणि देशभरात
करिअरची संधी.
चंद्रपूर, ता. १८ : लोकजागृती संस्था चंद्रपूरच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोज रविवारला सकाळी 10 वाजता एक दिवसीय निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिनय नाट्य कार्यशाळेला झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाट्यकलावंत गायक अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार होणार आहे सकाळी १० ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नाट्य शिबिराची वेळ ठेवण्यात आली आहे.
शिबीरात व्हाईस अँड स्पीच, बॉडी मुव्हमेन्ट इप्रोवायजेशन, इम्पल्स, कम्युनीकेशन, म्युजीक अँड सॉंग व अभिनय स्किल शिकवल्या जाणार आहे. या शिबीरासाठी १2 ते ५५ वयोगटातील नवोदित इच्छुक कलाकारांना संधी देण्यात येणार आहे.
वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथील आदर्श महाविद्यालयामध्ये या नाट्य अभिनय कार्यशाळेला प्रारंभ होत असून गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टीतील आणि पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांनी या एक दिवसीय नाट्य कार्यशाळेचा लाभ घ्यावा . फक्त २० ते २५ शिबिरार्थींची निवड करण्यात येणार आहे. नवोदित कलावंतांना तंत्रशुध्द नाट्यप्रशिक्षण मिळावे, रंगभूमीवर काम करण्यास अडचन भासु नये व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा हा मुख्य उद्देश्य असुन त्यांच्या प्रवेशासाठी विपिन राऊत 7020249890 व अंकुश शेडमाके 8999393128 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा किंवा लोकजागृती संस्था चे
निर्माता दिग्दर्शक डॉ अनिरुद्ध वनकर यांच्याशी संपर्क करून किंवा आदर्श महाविद्यालयात वेळेवरती प्रवेश घेऊन आपण या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिरुद्ध वनकर यांनी आवाहन केले आहे. संवादाता अभिजीत गाईन