राजे अंब्रीशराव महाराजांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्लीत सामाजिक उपक्रम

  तालुका प्रतिनिधी :-प्रणित पेदापल्ल्लीवार 


रुग्णालय, शाळा व अंगणवाड्यांमध्ये फळे, बिस्किटे आणि शालेय साहित्याचे वाटप

एटापल्ली : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय तसेच मदरलँड स्कूल येथे फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील विविध गावांमधील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले.


दोडीटोला, गुरुपल्ली, रेकणार, पीपली, तोडसा आणि पेठा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून रुग्ण, विद्यार्थी आणि बालकांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या उपक्रमावेळी भाजपचे जिल्हा सचिव मोहन नामेवार, तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार, महिला मोर्चा अध्यक्ष जयाताई पुडो, जम्बोजवार ताई, प्रवीण मुनरत्तीवार, अनिकेत मामीडवार, बाबला मुजुमदार, अक्षय पुंगाटी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Also Read